उदयनराजेंनी ‘करून दाखवलं’, गड राखला

November 28, 2016 2:53 PM0 commentsViews:

Udayan raje bhosll21328 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण शब्द खरा ठरवतं विजयरथ खेचून आणलाय. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने 22 जागा जिंकत आपणच राजे असल्याचं दाखवून दिलंय.

सातारा नगरपरिषदेच्या आखाड्यात उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्यामुळे साता•यात राजे विरुद्ध राजे असा या लढाईला रंग आला होता. “40 जागा जिंकून दाखवेन नाहीतर राजकारण सोडेन” असंच उदयनराजे यांनी जाहीर करुन टाकलं होतं. अखेर आज मतमोजणीत उदयनराजे यांनाच जनतेनं पाठिंबा दिला असून त्यांचा ‘विजयाभिषेक’ केलाय.
उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने 22 जागा जिंकल्यात. तर शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपला 6 जागा पटकावल्या आहे. नगराध्यक्षपदी सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम विराजमान होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close