पृथ्वीबाबांची खंत, ‘गड आला पण सिंह गेला’

November 28, 2016 4:51 PM0 commentsViews:

pruthaviraj_chavan428 नोव्हेंबर : कराडमध्ये काँग्रेससाठी गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था झालीय. कराडमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 16 नगरसेवक निवडून आले. पण नगराध्यक्षपद मात्र भाजपने हिसकावून घेतलं. भाजपच्या रोहिणी शिंदे यांनी इथं नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकलीय. त्यामुळेच कराडचा गड तर काँग्रेसने राखला पण भाजपने नगराध्यक्षपदी मुसंडी मारली.

कराडची निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यात त्यांना यशही मिळालं पण नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा झालेला पराभव पृथ्वीराज चव्हाणांच्या जिव्हारी लागलाय. यावेळी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक करण्याची भाजपची खेळी कराडमध्येही यशस्वी ठरलीय.

भाजपने एमआयमशी संधान साधलं आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार द्यायला सांगितलं. त्यामुळे काँग्रेसची मतं फुटली, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

नगराध्यक्ष हा नगरपालिकेच्या मुख्य सभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यामुळे कराडमध्ये बहुमतात असलेलं काँग्रेस भाजपच्या नगराध्यक्षांच्या मदतीशिवाय महत्त्वाचे प्रस्ताव मान्य करू शकत नाहीत. बहुमत काँग्रेसचं आणि नगराध्यक्ष मात्र भाजपचा यामुळे नगरपालिकांचं काम ही तारेवरची कसरत असणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close