मराठी मुलांना संधी देण्याच्या मागणीवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाण

October 19, 2008 6:17 AM0 commentsViews: 6

दिनांक 19 ऑक्टोबर, मुंबई- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मराठी मुलांना या परीक्षेत संधी देण्याच्या मागणीवरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. मुंबईतल्या डोंबिवली,अंधेरी, ठाणे अशा विविध सेंटर्सवरील परप्रांतीय परीक्षाथीर्ंना मारहाण करण्यात आली. मराठी मुलांना सरकारी नोकरीत संधी देण्याच्या मागणीवरून ठाण्यात मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं. ठाणे स्टेशनवर मारहाण करून परप्रांतीय परीक्षाथीर्ंना हुसकावून लावण्यात आलं. डोंबिवलीत विद्यार्थ्यांना तसेच टिळक कॉलेजमध्यही परीक्षाथीर्ंना मारहाण करण्यात आली.

close