उमेश यादव कॅरेबियनपासून दूर

May 8, 2010 1:21 PM0 commentsViews: 5

8 मे

दुखापतग्रस्त प्रवीण कुमारच्या जागी भारतीय टीममध्ये स्थान पटकावणारा उमेश यादव विंडीजविरूद्धच्या मॅचसाठी कॅरेबियनला पोहचू शकणार नाही.

कारण विंडीजला जाण्यासाठी लागणारा ट्रान्झिट व्हिसा त्याला मिळालेला नाही.

शनिवार-रविवारच्या सुटीमुळे व्हिसा मिळण्यास वेळ लागत असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. सोमवरपर्यंत उमेशला व्हिसा मिळेल, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी मॅच खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताला पराभव पत्करावा लागला होता. आता धोणीला झहीर खान आणि आशिष नेहरा यांचा जोडीदार म्हणून विनय कुमारशिवाय पर्याय राहिलेला नाही.

close