पंतप्रधान मोदींनी केलं फडणवीस आणि दानवेंचं अभिनंदन

November 28, 2016 9:20 PM0 commentsViews:

modi_fadanvis28 नोव्हेंबर : नगरपरिषद निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारलीये. भाजपच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचं अभिनंदन केलंय.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का देत 52 जागा जिंकल्या आहेत. विधानसभेच्या विजयानंतर स्थानिक नगरपरिषदेच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठ थोपाटलीये. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचं अभिनंदन केलं. राज्यातल्या पालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं भाजपवर विश्वास दाखवलेला हा विश्वास आहे अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close