हा नोटाबंदीचा विजय नसून जुन्या नोटांचा विजय -राज ठाकरे

November 28, 2016 10:49 PM0 commentsViews:

raj_thackery_new28 नोव्हेंबर : नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने सरशी केलीये. भाजपच्या या विजयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत टीप्पणी केलीये. हा नोटाबंदीचा विजय नसून जुन्हा नोटांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीवर परिणाम होतील अशी चर्चा रंगला होती. निवडणूक प्रचारदरम्यान कोट्यवधी रुपयेही जप्त करण्याच्या घटना घडल्यात. मात्र, नोटाबंदी असल्यामुळे पैसे वाटपाच्या कार्यक्रमाला चांगलाच लगाम बसला. भाजप नगरपरिषदेच्या निवडणुकीत छाप पाडेल की नाही अशी चर्चा होती मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारली. नगरपरिषदेच्या निकालावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. हा नोटाबंदीचा विजय नसून जुन्हा नोटांचा विजय आहे अशी मार्मिक प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close