नगरपरिषद निवडणुकीत भाजपची सरशी

November 28, 2016 10:38 PM0 commentsViews:

fadanvis_win28 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवल्यानंतर भाजप स्थानिक निवडणुकीची परीक्षा पास होईल का ? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र,नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारलीये. राज्यातील 22 नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकावलाय. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळाले असून भाजपने सर्वाधिक 52 जागा पटकावल्या आहे. तर काँग्रेसने 21 नगरपालिकेवर काबीज करून जोरदार कमबॅक केलंय. तर राष्ट्रवादीला बॅकफूटवर गेली असून 18 नगरपालिकांवर समाधान मानावे लागले आहे.

देवेंद्र सरकारने सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या खऱ्या पण स्थानिक पातळीवर भाजपला सत्तेसाठी वाटाघाटी करावी लागली. नोटाबंदीचा निर्णय आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वादळामुळे स्थानिक निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील अशी शंका निर्माण झाली होती. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक ही मिनी विधानसभा म्हणून पाहिली जात होती.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुसंडी घेत आघाडी घेतली. मात्र, दुपारनंतर भाजपने जोरदार उसळी घेत दोन्ही पक्षांना मागे टाकलं. अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले खरे पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला यश आलं. तब्बल 52 नगराध्यक्ष निवडून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातृभूमी भाजपचे तब्बल 17 नगराध्यक्ष निवडून आले. खान्देशमधून 7, पश्चिम महाराष्ट्रात 5, मराठवाडा आणि कोकणात प्रत्येकी 3 जागी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. तर 22 नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकावला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही जोरदार कमबॅक कर 21 नगरपालिकेत सत्ता मिळवलीये. नगरपालिका निवडणुकीत वरचष्मा असलेल्या राष्ट्रवादीची मात्र पिछेहाट झालीये.

18 नगरपालिकांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व मिळवलंय. तर भाजपचा सत्तेतला सहकारी शिवसेनेला 15 नगरपालिकेवर भगवा फडकावता आलाय. 12 नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांची सत्ता आलीय. तर 26 नगरपालिकांमध्ये त्रिशंकू अवस्था आहे. भाजपच्या यशामुळे स्थानिक निवडणुकीतही देवेंद्र सरकारने जनमतचाचणी पास झाल्याचं चित्र आहे.

 

कोणी बाजी मारली ?
 
नारायण राणेंचं कोकणात कमबॅक
सावंतवाडी नगर परिषदेत काँग्रेसला सर्वाधिक 8 जागा
पण नगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार

 
दोन राजेंच्या लढाईत उदयनराजेंची बाजी
सातार्‍यात उदयनराजेंचा विजय
उदयनराजेप्रणित सातारा विकास आघाडीला 40 पैकी 22 जागा
नगराध्यक्षपदी उदयनराजेप्रणित आघाडीच्या माधवी कदम विजयी
शिवेंद्रराजे यांच्या पत्नी आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिष्ठा राखली
चंद्रपूरमध्ये 5 पैकी 4 नगरपालिकांमध्ये भाजपचा विजय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मूळगाव असलेल्या मूल नगरपरिषदेत भाजपचा झेंडा
मूलच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रत्नमाला भोयर विजयी

बहिण – भावाच्या लढतीत धनंजय मुंडेंची सरशी
परळी नगरपालिकेत राष्ट्रवादीचा विजय
पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सरोजिनी हलगे यांचा विजय
परळीत राष्ट्रवादीला 27 जागा तर भाजपला अवघ्या 4 जागा

 
काका-पुतण्याच्या लढाईत सुनील तटकरेंची बाजी
रोहा नगरपालिकेत 17 पैकी 13 जागा राष्ट्रवादीला
शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या संदीप तटकरेंचा पराभव

 

हे पण वाचा

» नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपला ‘अच्छे दिन’, राष्ट्रवादीची पिछेहाट

हा नोटाबंदीचा विजय नसून जुन्या नोटांचा विजय -राज ठाकरे

नगरपरिषदेच्या निवडणुकीत छगन भुजबळांचा सुपडा साफ

पंतप्रधान मोदींनी केलं फडणवीस आणि दानवेंचं अभिनंदन

 पृथ्वीबाबांची खंत, ‘गड आला पण सिंह गेला’
कोकणात नारायण राणेंचं कमबॅक, देवगडपाठोपाठ सावंतवाडीतही राणेंची सत्ता

 रोह्यात काकाची सरशी, पुतण्या संदीप तटकरे पराभूत

 उदयनराजेंनी ‘करून दाखवलं’, गड राखला
 परळीत भावाची बाजी, पंकजाताईंचा पराभव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close