नागपूर स्टेशनवर स्फोटके

May 8, 2010 2:34 PM0 commentsViews: 4

8 मे

नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर 80 डिटोनेटर्स आणि 75 जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.

स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म नंबर चारवरून हे सगळे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी आत्तापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव पन्हालाल रामटेक असे आहे.

उमरेडवरून गोंडवना एक्सप्रेसने तो जाणार होता. सोबत त्याने जिलेटीनही आणले होते.

close