निकालाआधी रॅली काढणारे शिवसैनिक तोंडघशी, नगराध्यक्षपद मनसेकडे !

November 28, 2016 10:46 PM0 commentsViews:

khed28 नोव्हेंबर : खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी मनसेचे वैभव खेडेकर विजयी झालेत. वैभव खेडेकर यांचा 710 मतांनी विजय झाला. त्यामुळे आधीच विजयी मिरवणूक काढणाऱ्या शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली. रामदास कदम यांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की यशस्वी होऊ, असा विश्‍वास या शिवसैनिकांना वाटत होता. मात्र शिवसैनिकांचा हा अतिआत्मविश्‍वास पाहून त्यांना काय म्हणावं हेच सर्वसामान्य नागरिकांना कळत नव्हतं.

खेडमध्ये काल नगर परिषदेसाठी मतदान संपलं आणि लगेचच शिवसेनेने विजयी मिरवणूक काढली पण आज मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वेगळाच निकाल आला. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. नगरपालिकेवर मात्र शिवसेनेची सत्ता आली आणि आघाडीचे 7 नगरसेवक निवडून आले. खेडमध्ये मनसेला एक नगराध्यक्षपद मिळाल्यामुळे मनसेने काही प्रमाणात का होईना, इथे सत्ता राखली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close