जम्मूमधील लष्कराच्या तोफखाना केंद्रावर दहशतवादी हल्ला

November 29, 2016 8:46 AM0 commentsViews:

ceasefire

29 नोव्हेंबर : जम्मूजवळ नग्रोटा इथे दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर आज (मंगळवारी) पहाटे हल्ला केला आहे. पहाटे 5.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी या छावणीवर ग्रेनेडने हल्ला चढवला आणि गोळीबारही केला. या हल्ल्यात एक मेजर आणि 2 सैनिक जखमी झाले आहे. या संपूर्ण भागाला घेराव घातला गेला आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

हा हल्ला होताच प्रशासनाने नगरोटामधील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या छावणीजवळ 4 दहशतवादी दिसले आहेत. नग्रोटा शहर जम्मू जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 1A च्या जवळ आहे. हा महामार्ग जम्मू शहराला उधमपूरशी जोडतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close