कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदेचे पोलिसांकडून एन्काऊंटर

November 29, 2016 12:55 PM0 commentsViews:

crime

29 नोव्हेंबर : पुण्यातील ग्रामीण पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये कुख्यात गुन्हेगार श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे ठार झाले. दोघेही तळेगाव दाभाडे इथल्या माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात गुंडही होते. तळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये त्यांची दहशत होती.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस दाभाडेच्या शोधात होते.  चाकणच्या वरसाई पवनचक्कीच्या डोंगरात ते लपल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी डोंगराला वेढा घालून त्यांना शरण यायला सांगितलं मात्र त्यांनी जुमानले नाही. श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांनी पोलिसांवर 9 राऊंड फायर केले, अखेर पोलिसांनीही प्रतिकार करत पाच राऊंड फायर केलं. त्यात दोघेही ठार झाले आहेत. त्यांच्याकडे 4 पिस्टल, 1 कट्टा आणि 42 राऊंड सापडलं.

कोण आहे शाम दाभाडे?

- तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळकेंच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी
– शाम दाभाडेवर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे
– खंडणी आणि दरोड्यासह एकूण 22 गुन्हे
– तळेगाव, मावळ परिसरात दाभाडेची प्रचंड दहशत


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close