‘बेफिक्रे’साठी ओठांवर शस्त्रक्रिया केली नाही – वाणी कपूर

November 29, 2016 12:15 PM0 commentsViews:

Befikre-Still

29 नोव्हेंबर: रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली ती दोघांच्या बोल्ड सीनची. असंही म्हटलं जात होतं की कीसिंग सीनसाठी वाणी कपूरनं ओठांवर शस्त्रक्रिया केली. पण असं काहीही झालं नसल्याचं वाणी कपूरनं म्हटलंय.

वाणी कपूर म्हणते,’मी काही ओठांवर शस्त्रक्रिया केलेली नाही.तुम्हाला माझ्याकडे पाहून असं वाटत नाही का? शस्त्रक्रिया केली असती तर लगेच कळलं असतं.आणि माझ्याजवळ एवढे पैसेही नाहीत.आणि असले तरी मी अशा गोष्टींवर खर्च करणार नाही.’

‘बेफिक्रे’बद्दल बरीच उत्सुकता आहे.या सिनेमातून आदित्य चोप्रा आठ वर्षांनी दिग्दर्शनात येतोय. 2008मध्ये आदित्य चोप्रानं ‘रब ने बना दी जोडी’चं दिग्दर्शन केलंय. रणवीर आणि वाणी ही जोडी काय कमाल दाखवतेय हेच आता पाहायचं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close