ब्राझीलच्या फुटबॉलपटूंना घेऊन जाणार विमान कोलंबियात कोसळलं

November 29, 2016 1:43 PM0 commentsViews:

plane-crash-Colombia-737649

29 नोव्हेंबर :  ब्राझीलमधील फुटबॉलपटूंसह 72 प्रवाशांना घेऊन अमेरिकेला निघालेलं एक विमान कोलंबिया इथं कोसळलं आहे. कोलंबिया प्रशासनानं या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, हा अपघात नेमका कशामुळं झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही.

अपघातग्रस्त विमानात ब्राझीलमधील चॅपेकोन्स क्लबच्या फुटबॉल संघाचे खेळाडू होते. मेडेलिन इथं सुरू असलेल्या ‘कोपा सुदामेरिकाना 2016′ या स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी हा संघ मेडेलिनला जात होता.

दरम्यान, ही दुर्घटना कोलंबियात घडली असली तरी विमान नेमकं कुठं कोसळलं? त्यातील प्रवाशांबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close