बँक व्यवहार जाहीर करा; मोदींचे आमदार, खासदारांना आदेश

November 29, 2016 2:23 PM0 commentsViews:

modi_qutar_speech

29 नोव्हेंबर :  नोटबंदी झाल्यापासून म्हणजे 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंतच्या बॅंक व्यवहाराचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेशच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या खासदार आणि आमदारांना दिले आहेत. भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मोदींनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.या निर्णयाच्या विरोधात विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने विरोधकांची बोलती बंद करण्यासाठी भाजपच्या सर्व मंत्री, खासदारांना नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर म्हणजेच 8 नोव्हेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंतचे सर्व बँक खात्यांचे तपशील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे 1 जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close