नक्षलवादी हल्ल्यात 7 जवान शहीद

May 8, 2010 2:56 PM0 commentsViews: 1

8 मे

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये संध्याकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग हल्ल्यात सीआरपीएफचे 7 जवान शहीद तर 13 जवान जखमी झाले आहेत.

आयईडीव्दारे नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली.

विजापूरजवळच्या चिन्नाकोडकजवळ ही घटना घडली.

नक्षल्यांनी ज्या वाहनावर हल्ला केला ते वाहन बुलेटप्रुफ वाहन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सीआरएफच्या जवानांच्या कँपला धान्य आणि इतर साहित्य पोचवण्यासाठी हे जवान जात होते.

close