मोहाली टेस्टमध्ये भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, मालिकेत 2-0ने आघाडी

November 29, 2016 4:35 PM0 commentsViews:

india_win429 नोव्हेंबर : मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियानं चौथ्या दिवशीच दणदणीत विजय मिळवलाय. 8 विकेटस् राखून टीम इंडियाने इंग्लंडला धूळ चारलीये. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडला 236 रन्सवर रोखल्यानंतर, भारतापुढे विजयासाठी 103 धावांचं लक्ष्य होतं.   पार्थिव पटेलच्या 67 रन्सच्या जोरावर भारतानं चौथ्या दिवशीच विजयावर शिक्कामोर्तब केला.

मोहाली येथे भारत आणि इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत यजमान संघाने पाहुण्यांना आठ विकेट्सने पराभूत केले. आज चौथ्या दिवशी इंग्लंडने दुस•या डावात दिलेल्या 103 धावांचा पाठलाग करताना मुरली विजय 0 आणि चेतेश्वर पुजारा 25 स्वस्तात बाद झाले. विजय मिळवताना पार्थिव पटेल 67 आणि विराट कोहली 06 नाबाद राहिले.

इंग्लंडचा दुसरा डाव भारतीय गोलंदाजांनी 236 धावांत गुंडाळल्याने त्यांना फक्त 103 धावा उभ्या करता आल्या.दुस-या डावात भारतीय संघाकडुन आर.अश्विनने तीन,तर मोहम्मद शमी,रविंद्र जडेजा आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. इंग्लंडकडून नेहमीप्रमाणे जोइ रुटने 78 धावांची झुंज देत सामन्यावर प्रयत्न केला.पण त्यात फारसं यश आलं नाही. या सामन्यात जडेजाने 90 धावांची सर्वाधिक खेळी करुन तो सामनावीर ठरला. त्याला मैदानावर साथ देताना जयंतने 50 धावा मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक साजरे केले. दरम्यान अश्विननेही 72 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close