दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांना वीरमरण

November 29, 2016 6:12 PM0 commentsViews:

javan_shaid29 नोव्हेंबर : काश्मीरमधल्या नग्रोटामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलंय. पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगिर गोसावी हे दहशतवादी हल्यात शहीद झाले आहे. तर नांदेडचे संभाजी कदम यांना जम्मूत वीरमरण आलंय.

जम्मूजवळ नग्रोटा इथं दहशतवाद्यांनी लष्करी छावणीवर आज (मंगळवारी) पहाटे हल्ला केला. पहाटे 5.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी या छावणीवर ग्रेनेडने हल्ला चढवला आणि गोळीबारही केला. या हल्ल्यात एक मेजर आणि 2 सैनिक जखमी झाले. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगिर गोसावी शहीद झाले. तर नांदेडचे संभाजी कदम यांना जम्मूत वीरमरण आलंय.

संभाजी कदम हे मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान होते. कदम हे नांदेडच्या जानपुरी इथलं रहिवासी होते. नांदेडमधल्या जानपुरीतून लष्करात गेलेले ते पहिलेच जवान होते. या दोघांच्याही घरांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close