मी उद्धव ठाकरेंशी बोलतो, संजय राऊतांशी नाही-मुख्यमंत्री

November 29, 2016 6:50 PM0 commentsViews:

cm_on_raut329 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेत भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पण तो यशस्वी होणार नाही. मी उद्धव ठाकरेंशी बोलतो, संजय राऊतांशी नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला. तसंच आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक आहोत असं सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत संकेतही दिले.

नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात भाजपला यश मिळाल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजप हा राज्यात नंबर वन आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मोदींच्या धोरणांना जनतेचा पाठिंबा आहे, मतदारांनी दिलेला हा सकारात्मक कौल आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ही निवडणूक मिनी विधानसभाच होती. आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजला यश मिळेल, असा दावाही त्यांनी केलाय. राज्यातल्या मराठा मोर्चाचा भाजपला फटका बसला नाही, तसंच नोटबंदीच्या निर्णयाचं जनेतेने स्वागत केलंय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी राज्यात थेट नगराध्यक्षाची निवडणूक घेतली गेली. नगराध्यक्षांना अधिक अधिकार असले पाहिजे, अध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये समन्वय पाहिजे, त्यादृष्टीने कायद्यात आणखी सुधारणा करण्याचा विचार करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याआधी 80 नगरपलिकांमध्ये भाजपला एकही जागा नव्हती. या पाश्‍र्वभूमीवर विजय महत्त्वाचा आहे, असंही ते म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेची युती उशिरा जाहीर झाल्यामुळे आम्हा थोडा तोटा झाला, हेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजप – सेनेत भांडणं लावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी ठासून सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close