पुणे: तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

November 29, 2016 7:15 PM0 commentsViews:

subham_khandale29 नोव्हेंबर : पुण्यात राजीव गांधी स्कूलच्या इमारतीवरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. सहावीत शिकणा-या शुभम खडाळे या विद्यार्थ्याची शाळेच्या ऑडियोटोरियमच्या स्लॅब वरुनखाली पडून दुदैर्वी मृत्यू झाला आहे.

पुण्यातील सहकारनगर परिसरातील राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये ही घटना घडलीय. शुभम हा मध्यान्ह सुटीच्या वेळी वर्गा बाहेर असताना ही दुर्घटना घडली आहे. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शुभमला आपला जीव गमवावा लागला आहे. शुभम खेळत असताना ऑडियोटोरियमच्या स्लॅबवर त्याची वस्तु शोधण्यासाठी गेला होता त्यावेळी तो खाली कोसळला. शाळा प्रशासनाने सभागृहाच्या स्लॅबचे खठडे लॉक न केल्यामुळे शुभमला ऑडियोटोरियंमच्या स्लॅबवर उतरता आलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close