पानसरे हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेविरोधात आरोपपत्र दाखल

November 29, 2016 8:16 PM0 commentsViews:

virendra_tawade29 नोव्हेंबर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातला आरोपी वीरेंद्र तावडेवर अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एसआयटीकडून कोल्हापूर न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

कॉ.गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे एसआयटीच्या कोठडीत आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तीन वर्षांच्या तपासानंतर वीरेंद्र तावडेला चौकशीअंती अटक करण्यात आली होती. दाभोलकरांच्या हत्येमागे तावडेच हा खरा सूत्रधार होता हे स्पष्ट झालंय.

ज्या प्रकारे दाभोलकरांची हत्या झाली होती. तशाच प्रकारे पानसरे यांचीही हत्या करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे हा आठ वर्ष कोल्हापुरात वास्तव्यास होता असं सीबीआय तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळेच त्याचा पानसरेंच्या हत्येशी संबंध होता याबाबत एसआयटीने तपास केला. आता त्याच्याविरोधात एसआयटीने आरोपपत्र दाखल केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close