विठूरायाच्या दर्शनासाठी ‘एन्ट्री फी’

May 10, 2010 9:14 AM0 commentsViews: 6

10 मे

पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांकडून पोलीस सध्या 'एन्ट्री फी' वसूल करताना दिसत आहेत.

अधिक महिना सुरू असल्याने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात.

खाजगी वाहनांतून येणार्‍या या भाविकांना, पंढरपूरच्या वेशीवर अडवून, पोलीस ही 'एन्ट्री वसूल' करत आहेत.

प्रत्येक गाडीकडून ही वसुली केली जात आहे.

यातून दिवसभरात जमलेला 'प्रसाद' नंतर सगळे पोलीस वाटून घेतात.

close