भरधाव टेम्पोने दोन वाहतूक पोलिसांना उडवलं

November 30, 2016 9:25 AM0 commentsViews:

mumbai_police430 नोव्हेंबर : मुंबईत वाकोला उड्डानपुलाजवळ एका टेम्पोने दोन वाहतूक पोलिसांना उडवल्याची घटना घडलीे. या दुर्घटनेत धनंजय पवार आणि गणेश शिंदे हे वाहतूक पोलीस जखमी झाले. त्यांना सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

वाकोला उड्डानपुलाजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या अभय घडसी या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन्ही पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close