जनधन खात्यातून महिन्याला फक्त 10 हजार काढता येणार !

November 30, 2016 10:10 AM0 commentsViews:

jandhan_lemit30 नोव्हेंबर : जर तुमचं जनधन योजनेतलं खातं असेल तर तुम्हाला फक्त आता महिन्यात 10 हजार रूपयेच खात्यातून काढता येणार आहेत. एवढंच नाही तर तुम्ही जनधनचे नवे खातेदार असाल आणि पूर्ण माहिती दिलेली नसेल तर खात्यातून फक्त पाचच हजार रूपये काढता येणार आहेत अशी घोषणा रिझर्व्ह बँकेनं केलीये.

नोटाबंदीनंतर जनधन योजनेत मोठ्या प्रमाणात काळा पैसा आल्याचा संशय निर्माण झाल्यामुळे आरबीआयनं ही नवी मर्यादा घातलीय. पण 10 हजार पेक्षा जास्त पैसे काढायचे असतील तर त्यासाठी बँक मॅनेजरला काही अटींसह अधिकार देण्यात आलाय.

मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जनधनच्या खात्यातल्या रकमेत जवळपास 60 टक्क्यानं वाढ झालीय. नोटबंदीपूर्व जनधन खात्यांमध्ये 27 हजार कोटी रूपये जमा होते ते आता 72 हजार कोटींवर पोचल्याचं उघड झालंय. यात अनेक ठिकाणी शेतक•यांच्या आणि मजुरांच्या नावावर धनदांडग्यांनी पैसे व्हाईट केल्याचा संशय आहे. त्यावर लगाम लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ही नवी मर्यादा आणलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close