मुख्यमंत्रीपदाचा पेच आज सुटणार

May 10, 2010 9:26 AM0 commentsViews: 2

10 मे

झारखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच आज सुटण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या नावाबाबत विचार करण्यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक दिल्लीत सुरू आहे. अर्जुन मुंडा, यशवंत सिन्हा आणि महसूलमंत्री नीलकांत मुंडा हे मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार आहेत.

झारखंड मुक्ती मोर्चाने राज्याचा मुख्यमंत्री हा आदिवासी असावा असा आग्रह धरला आहे.

तर गेल्या अनेक वर्षांपासून बिगर आदिवासी मुख्यमंत्री झाला नाही, असे भाजपच्या काही नेत्यांचे मत आहे.

close