गेल्या वर्षभरात 89 जवान शहीद !

November 30, 2016 12:27 PM0 commentsViews:

javan_shaheed330 नोव्हेंबर : जम्मू काश्मीरमध्ये शहीद होणाऱ्या जवानांचा आकडा मोठा होताना दिसतोय आणि तीच चिंता लष्कराला सतावतेय. कारण गेल्या वर्षभरात आतापर्यंत जवळपास 89 जवानांना जीव गमवावा लागलाय तर दोनशे पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत.

जवानांचा शहीद होण्याचा हा आकडा वर्षे संपता संपता दशकातला सर्वाधिक आकडा होण्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे त्यातही कमांडर किंवा लाईन ऑफ ड्युटीवर टीम लीड करणारे अधिकारी अधिक मारले जातायत त्यामुळे प्रत्यक्ष युद्धात लढण्यासाठी लष्कराकडे अधिकारीच नसतील अशी साशंकताही व्यक्त केली जातेय.

ज्या प्रमाणात अधिकारी शहीद होतायत त्या प्रमाणात अतिरेकी मात्र मारले जात नसल्याचंही सुरक्षा जाणकारांना वाटतंय. हिजबुलचा कमांडर बु-हाण वणीच्या खात्म्यानंतर तसंच भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर लष्करावरच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close