देशभरात चित्रपटाआधी राष्ट्रगीत बंधनकारक -सुप्रीम कोर्ट

November 30, 2016 1:41 PM0 commentsViews:

national anthem in theatres india30 नोव्हेंबर : देशभरात चित्रपटाआधी राष्ट्रगीत लावणं बंधनकारक असणार आहे असे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसंच राष्ट्रगीतावेळी राष्ट्रध्वज पडद्यावर दाखवला गेला पाहिजे आणि राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे असंही कोर्टाने स्पष्ट केलंय.

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत पडद्यावर सुरू करणे किंवा नाही करणे अशी देशभरात नियमावली नसल्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण होत होते. हे टाळण्यासाठी आता देशभरासाठी सुप्रीम कोर्टाने नवे धोरण स्पष्ट केले आहे. याआधी महाराष्ट्रात चित्रपटगृहात राष्ट्रगीत दाखवणे बंधनाकारक होते. त्याच धर्तीवर देशभरात चित्रपटाआधी राष्ट्रगीत लावणं बंधनकारक असणार आहे तसा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला.या आदेशाबाबतची प्रत काढण्यासाठी कोर्टाने सरकारला एका आठवड्याचा अवधी दिला आहे. त्याचबरोबर राष्ट्रगीत सुरू असताना उभं राहणंही बंधनकारक असणार आहे. राष्ट्रगीत दाखवताना त्यातून कोणताही नफा कमवण्यास कोर्टाने मनाई केली आहे.

दरम्यान, राष्ट्रगीतला उभ राहवं लागतं म्हणून काही प्रेक्षक उशिरा येतात. त्यामुळे राष्ट्रगीत झाल्यावर सिनेमागृहाचे दरवाजे बंद करावे अशी मागणी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close