रद्द झालेल्या नोटा बदलून दिल्या प्रकरणी रोखपालावर गुन्हा दाखल

November 30, 2016 2:10 PM0 commentsViews:

ondha4हिंगोली, 30 नोव्हेंबर : औंढा नागनाथ इथल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या रोखपालावर बेकादेशीर नोटा बदलून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रोखपालाने ओळखपत्र आणि अर्ज भरून न घेता चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून दिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. बापूराव गुहाडे असं अटक करण्यात आलेल्या रोखपालचं नाव आहे.

औंढा नागनाथ शाखेचे मॅनेजर नवदीपरंजक सहाय हे 29 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान सुट्टीवर होते. त्यांनी पदभार अनिल फेलतुरी यांना दिला होता. या दरम्यान सरकारने 8 नोव्हेंबरला जुन्या पाचशे हजारच्या नोटा चलनातून बाद केल्या. 15 नोव्हेंबरला परळी शाखेतून आलेले 20 लाख रुपये रक्कम प्रभारी मॅनेजर फेलतुरी आणि रोखपाल बाबुराव गुहाडे यांनी ताब्यात घेतली. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही रक्कम वाटण्यात आली. मात्र दुस-या दिवशी तपासणीमध्ये ओळखपत्र न घेता आणि अर्ज भरून न घेता पैसे बदलून दिल्याचं स्पष्ट झालंय. 21 नोव्हेंबरला गुहाडे यांना निलंबित करण्यात आलं. तर 29 नोव्हेंबरला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close