भारतीय लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळलं; 3 अधिकारी ठार

November 30, 2016 3:17 PM0 commentsViews:

cheetah

30 नोव्हेंबर :  पश्चिम बंगालच्या सुकना येथे बुधवारी भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात तीन अधिकारी ठार झाले तर एक गंभीर जखमी आहे.

आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली.

लष्कराचे हे चित्ता हेलिकॉप्टर होते. पायलट आणि तीन अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते. तर एक ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी गंभीर आहे.

दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कराकडून आता याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close