आरक्षणाच्या मागणीसाठी लातूरमध्ये मुस्लिमांचा भव्य मोर्चा

November 30, 2016 4:15 PM0 commentsViews:

Muslimm31

30 नोव्हेंबर : आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे मराठा समाज एकवटला असताना लातूरमध्ये मुस्लीम समाजानेही विराट मूक मोर्चा काढून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

आरक्षणासह इतर मागण्यांसाठी जवळपास एक लाखो मुसलमान बांधव या मोर्चेत सहभागी झाले होते. या मोर्चाला शहरातील इदगाह मैदानातून सुरुवात झाली. पाच मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱयांना मागण्यांचे निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली.

मुसलमानांचा मोर्चाही शांततेत आणि शिस्तबद्धपद्धतीनं पार पडला. मुस्लिमांच्या मोर्चाला मराठा तसच दलित मोर्चेकर्‍यांनीही पाठिंबा दिला.

सरकारनं शरीयतमध्ये ढवळा ढवळ करू नये, समान नागरी कायद्याला विरोध आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी अशा काही प्रमुख मागण्या मोर्चेकरांनी केल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close