नाशिकमध्ये भर रस्त्यात स्कूल व्हॅनने घेतला पेट, विद्यार्थी सुखरुप

November 30, 2016 7:53 PM0 commentsViews:

Burning VAN31

30 नोव्हेंबर : नाशिकमधल्या शिवाजी चौकात एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना आज (बुधवारी) दुपारी घडली. स्कूल व्हॅनने पेट घेतला त्यावेळी गाडीत सुमारे 15 ते 17 विद्यार्थी बसले होते. मात्र वाहनचालक आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानाने या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका झाली आणि पुढील अनर्थ टळला.

शिवाजी चौकातील शिवाजी पुतळ्याजवळून एक स्कूल व्हॅन जात होती. या दरम्यान गाडीतून धूर निघू लागला. वाहनचालकाला हा प्रकार वेळीच लक्षात आला आणि त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. यानंतर स्थानिकांच्या मदतीने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवण्यात आलं. विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याच्या काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतला.

दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेमुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close