संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या आखाड्यात

November 30, 2016 6:21 PM0 commentsViews:

Sambhaji briged12312

30 नोव्हेंबर :  संभाजी ब्रिगेडने आता निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतलीय. संभाजी ब्रिगेडने स्वत:ला राजकीय पक्ष म्हणून घोषित केलंय आणि आता ते निवडणूकही लढणार आहेत. राज्यात 18 महापालिका, पंचायत समित्या आणि निवडणुका संभाजी ब्रिगेड लढण्याचा निर्णय संभाजी ब्रिगेडने घेतलाय. या संघटनेने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लावून धरलीय.

मराठा समाजाची संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा उदय झाला होता. आता संभाजी ब्रिगेड राजकीय आखाड्यात उतरल्यानं राजकीय आखाड्यात आणखी एक भगवा पाहायला मिळणार आहे. संभाजी ब्रिगेड नेमकी कुणाची मतं खाणार याची उत्सुकता निर्माण झालीय. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे नेते आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने सुरू करण्यात आलेली ही मराठा संघटना जेम्स लेन प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली. जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकावरून संभाजी ब्रिगेडने पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये तोडफोड केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close