जिल्हा बँकांमधली खाती चौकशीच्या फेर्‍यात

November 30, 2016 8:55 PM0 commentsViews:

Das;jdajs

30 नोव्हेंबर :  राज्यातल्या जिल्हा बँका चौकशीच्या फेर्‍यात येण्याची शक्यता आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आल्यानंतर या नोटांची उलाढाल नक्की कशी झाली याबद्दल सरकार चौकशी करणार आहे. सहकारी बँकांमधली कर्जखाती आणि मोठ्या रकमेची खाती नक्की कुणाची आहेत, या खात्यांमधली रक्कम नक्की कुठून आली याचीही तपासणी करण्यात येणार आहे.

जर एखाद्याचं जिल्हा बँकेत खातं असेल तर त्या व्यक्तीच्या इतर बँकांच्या खात्यांचा तपशीलही तपासून घेतला जाणार आहे. वेगवेगळ्या खात्यांतून झालेला करोडोंचा व्यवहार नक्की कुणी आणि का केला याचीही माहिती तपासली जाईल. जिल्हा बँकांचे व्यवहार सरकारकडून तपासले जाणार असल्याने अनेकांचं धाबं दणाणलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close