पेट्रोल 13 पैशांनी महागले, डिझेल 12 पैशांनी स्वस्त

November 30, 2016 9:45 PM0 commentsViews:

petrol_price_hike

30 नोव्हेंबर :  देशभरात आज (बुधवारी) मध्यरात्रीपासून पेट्रोल महागले असून डिझेलच्या दरात मात्र कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होणार आहेत.

नोटाबंदीमुळे वैतागलेल्या सर्वसामान्यांना आता पेट्रोल दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैशांनी वाढ केली आहे. तर डिझेलचे दर प्रतिलिटर 12 पैशांनी कमी करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे वाढलेले भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमुल्यन यामुळे पेट्रोल–डिझेलच्या किंमतीमध्ये बदल करण्यात आल्याचे पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

कच्चा तेलाची किंमत आणि डॉलरचा दर याकडे लक्ष असून त्यानुसार आगामी काळातही दरात बदल केले जातील असं कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close