चीनलाही बसला जागतिक मंदीचा चटका

October 19, 2008 6:46 AM0 commentsViews: 4

19 ऑक्टोबर, आयबीएन-लोकमत ब्युरो – जागतिक मंदीचे चटके आता चीनलाही बसू लागलेत. गेल्या आठवड्यात खेळणी बनवणा-या दोन मोठ्या कंपन्या बंद पडल्यानं अनेक कामगार बेकार झाले आहेत. या कामगारांना त्यांचा पगारही मिळालेला नाही. त्यामुळे सरकारनेच आता या सहा हजार कामगारांना आर्थिक मदत केली आहे. या वर्षभरात चीनमध्ये अनेक उद्योग बंद पडले आहेत. वाढती महागाई, मजुरीचे वाढते दर आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे हे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्याचबरोबर अमेरिकेत आलेल्या मंदीच्या लाटेमुळे या वर्षात चीनची अमेरिकेतली निर्यातही पाच पॉईण्ट दोन टक्क्यांनी घटली आहे.

close