काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे टि्वटर अकाऊंट हॅक

November 30, 2016 11:08 PM0 commentsViews:

rahul-tweet_mos_050715011841

30 नोव्हेंबर :  काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अधिकृत टि्वटर अकाऊंट (@OfficeOfRG)हॅक झालं आहे. आज (बुधवारी) संध्याकाळी अज्ञात हॅकर्सनी गांधींचे अकाऊंट हॅक केलं. त्यानंतर त्यांनी आक्षेपार्ह मेसेज ट्विट केलं.

राहुल गांधींना टि्वटरवर 12 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सनी बुधवारी संध्याकाळी राहुल गांधींच्या टि्वटरवर काही मिनिटांत सुमारे डझनभर आक्षेपार्ह आणि अपमानास्पद ट्विट पोस्ट केलेत.  पोस्ट केल्यानंतर काही मिनीटांतच त्या डिलीट करण्यात आल्या.

देशाची लूट, नोटा बंदी आंदोलन, कुटूंब या संदर्भात अत्यंत हीन टिप्पणी करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close