खूशखबर ! ‘जिओ’च्या ग्राहकांसाठी 31 मार्चपर्यंत सर्व सेवा फ्री

December 1, 2016 5:29 PM0 commentsViews:

Cyk6LZ5UcAAuoQH

01 डिसेंबर : नोटबंदीमुळे तुम्ही त्रस्त झाले असाल तर आता रिलायन्स जिओच्या ऑफर ऐकून तुम्ही खुश होऊन जाल. कारण 31 मार्च 2017 पर्यंत नव्या आणि जुन्या ग्राहकांना जिओची 4G इंटरनेट सेवा फ्री देणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत मुकेश अंबानी बोलत होते.

‘जिओ हॅप्पी न्यू इयर’ असं या ऑफरचं नावं असून यातंर्गत जिओच्या नव्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत अमर्यादित व्हॉइस सेवा, व्हिडिओ कॉलिंग, एसएमएस आणि फोरजी इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे आजच्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना नोटाबंदीचं समर्थनही केलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी या कार्यक्रमात ग्राहक, सरकार आणि ट्रायचे आभार मानले. तसंच इतर कंपन्यांनी सहकार्य न केल्याने कॉल ड्रॉप झाल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. मात्र, आता जिओचा कॉल ड्रॉप रेट 90 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय, आता इतर कंपन्यांच्या ग्राहकांनाही त्यांचा नंबर चेंज न करता जिओत पोर्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्वपूर्ण माहितीही मुकेश अंबानी यांनी दिली. त्याचबरोबर, ग्राहकांच्या सोईसाठी जिओचं कार्ड आता घरपोच देण्यात येईल, असंही अंबानी यांनी सांगितलं.

1 सप्टेंबर 2016 रोजी जिओची 4G सेवा लॉन्च झाली. लॉन्च झाल्यापासून अवघ्या 3 महिन्यातच 5 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जिओशी जोडले गेले आहेत. तसंच दिवसाला 6 लाख ग्राहक जिओ 4Gची सेवा घेत असल्याचं मुकेश अंबानी यांनी नमूद केलं. एवढचं नाही तर फेसबुक, व्हॉट्सऍपपेक्षाही जिओची सेवा झपाट्याने वाढत आहे. आणखी चांगली सेवा देण्याचे जिओचे प्रयत्न असून इंटरनेटचा स्पीडही वाढवण्यावर जोर देणार असल्याचं, मुकेश अंबानींनी सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close