राहुल गांधींपाठोपाठ काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट हॅक

December 1, 2016 4:11 PM0 commentsViews:

congress759

01  डिसेंबर : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं काल (बुधवारी) ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर आज (गुरूवारी) सकाळी काँग्रेसचं अधिकृत अकाउंटही हॅक करण्यात आलं आहे. हॅकरने काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवर आक्षेपार्ह ट्विट टाकली आहेत. दरम्यान, हे अकाउंट काही वेळातच पूर्ववत करण्यात यश आलं आहे. पण बारा तासांत दोनदा काँग्रेसला सायबर हल्ल्यांना सामोरं जावं लागलं आहे.

‘काँग्रेसचं अधिकृत ट्विटर अकाउंट @INCIndia या नावाने आहे. हे अकाउंट आज सकाळी १० च्या सुमारास हॅक करण्यात आलं. त्यानंतर त्यावर आक्षेपार्ह ट्विट्सच्या पोस्ट टाकण्यात आल्या. ‘INC.in वर ई-मेलचा खच पडणार आहे. ख्रिसमस स्पेशलसाठी तयार राहा. तुमच्या पक्षाला जमीनदोस्त करण्यासाठी आमच्याकडे भरपूर माहितीचा खजिना आहे’, अशा प्रकारचे एकामागून एक ट्विट्स टाकण्यात आले.

दरम्यान, अशाप्रकारच्या सर्व आक्षेपार्ह पोस्ट तातडीने अकाउंटवरून हटवण्यात आल्या आहेत. तर  ट्विटर अकाऊंट पाठोपाठ काँग्रेस पक्षाचे वेबसाईट देखील हॅक करण्यात आली.आधी ट्विटर अकाऊंट, वेब साईस अशा प्रकारे हॅक होणं म्हणजे डिजीटल सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी दिली आहे. तर हा संपूर्ण प्रकार अतिशय अनैतिक असून यामागे फॅसिस्ट विचारसरणी असल्याची  टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेस पक्षाने दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. पण हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसने हा मुद्दा संसदेत आणण्याची पूर्ण तयारी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close