शहीद मेजर कुणाल गोसावी यांना अखेरचा निरोप

December 1, 2016 7:03 PM0 commentsViews:

asdadpy

01  डिसेंबर :  जम्मू काश्मीरमधील नागरोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे सुपूत्र पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी हे शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज (गुरूवारी) त्यांच्या मूळगावी अत्यंत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागरोटमध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना कुणाल गोसावींना वीरमरण आले. जम्मू काश्मीरहून त्यांचं पार्थिव त्यांच्या पंढरपूरातील मूळ गावी वाखारी इथे आणण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close