काळ्या पैशांनंतर मोदी सरकारचा सोन्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’

December 1, 2016 7:27 PM0 commentsViews:

Gold231

01  डिसेंबर : पाचशे आणि हजारच्या  नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता मोदी सरकारने सोन्याकडे आपला मोर्चा  वळवला आहे. विवाहित महिलांना 50 तोळे सोने बाळगता येणार आहे. तर अविवाहित महिलांना 25 तोळे, तर पुरुषांना केवळ 10 तोळे सोने बाळगता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सोने आढळल्यास आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे सरकार आता तुम्ही किती सोने बाळगता आहात यावर करडी नजर ठेवणार आहे.

काळा पैसा खणून काढण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काळ्या पैशावाल्यांचे धाबे दणाणले होते. या निर्णयानंतर अनेकांनी सोने खरेदी करून काळा पैसा पांढरा केल्याचा दाट संशय असल्याने मोदी सरकारने आहे. त्यामुळे आता थेट सोन्यावरच लक्ष्यभेद करत, मोठ्या प्रमाणात सोनं बाळगणाऱ्या व्यापारी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडावर आहेत.

अर्थमंत्रालयाने नव्याने केलेल्या घोषणेनुसार, विवाहित महिलांना 500 ग्रॅम म्हणजेच 50 तोळे सोने बाळगता येणार आहे. तर अविवाहित महिलांना 25 तोळे आणि पुरुषांना केवळ 10 तोळेच सोने बाळगण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त सोने आढळून आल्यास आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

आयकर विभागाच्या निर्णयानुसार, वारसा हक्काने मिळालेले सोने आणि घरातील सोन्यावर कोणत्याही प्रकारचे कर लागणार नाही. त्याचबरोबर उत्पन्नानुसार, सोनं ठेवण्यावर कोणतेही बंधन असणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close