जुन्या नोटा आता फक्त बँकेतच खपवा !

December 2, 2016 12:11 PM0 commentsViews:

bank_news33

02  डिसेंबर : नोटाबंदीला एक महिना झाल्यानंतरही तुमच्याकडे पाचशेच्या जुन्या नोटा असतील तर सावधान. आज मध्यरात्री पासून म्हणजेच, शुक्रवारी २ डिसेंबरपासून देशभरातील पेट्रोल पंप आणि विमानाच्या तिकीटांसाठी जुन्या नोटा स्विकारण्याची डेडलाइन संपणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जुन्या नोटा असतील तर त्याबदलण्यासाठी तुम्हाला शनिवारपासून बॅंकेत खेटे घालावं लागणार आहेत.

सरकारने 15 डिसेंबरपर्यंत या नोटा स्विकारण्यात येणार असल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र लोकांनी पेट्रोल-पंपावर आणि रेल्वे तिकीटांसाठी या नोटा खपविण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे बँकेने ही डेडलाइन बदलून 15 तारिख ऐवजी २ केली असून ती आज मध्यरात्री संपणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close