आता आधारकार्डद्वारेही होणार बँक व्यवहार

December 2, 2016 3:37 PM0 commentsViews:

cartoon-aadhaar-card-1_647_101615084943

02  डिसेंबर :  देशातील आर्थिक व्यवहार कॅशलेस करण्यासाठी सरकारचे सर्व स्तरातून प्रयत्न सुरु असतानाच नीती आयोगानं त्याचा रोडमॅप तयार केलाय. आधार कार्ड हेच आता कॅशलेस व्यवहारांचा कणा असणार आहे. एवढंच नाही तर आधार कार्डाचा डेबिट कार्ड म्हणूनही वापर करता येणार आहे.

 सरकारकडे आधारकार्डचा युनिक नंबर आहे तसंच प्रत्येक आधार कार्ड धारकाचे फिंगर प्रिंटस् अगोदरच सरकारकडे आहेत. त्यामुळे पैशाच्या ऑनलाईन ट्रान्सफरसाठी आधारकार्डाचा वापर करता येईल आणि तेच कॅशलेस व्यवहारांचा मोठा आधार असेल.

प्रत्यक्ष चलनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितलं. सध्या आधारकार्डाच्या मदतीने दररोज 1.31 कोटी ट्रान्झॅक्शन्स होतात. आमची 10 कोटींपर्यंत व्यवहार हाताळण्याची तयारी असून लवकरच दररोज 40 कोटींपर्यंत व्यवहार करु शकू, असा विश्वास पांडेंनी व्यक्त केला.

आधारकार्ड धारकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यातून पैसे डेबिट किंवा क्रेडीट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना एखादे बिल भरायचे असेल तर ते ही आधारकार्डद्वारे भरण्याची मुभा मिळणार आहे. आधारसंलग्न बँक खात्यातून होणाऱ्या व्यवहारांबाबत गोपनीयता पाळली जाणार आहे. आधार संलग्न बँक सेवांसाठी लवकरच अँड्रॉईड मोबाईल अॅपही सुरु करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातूनच फिंगरप्रिंट्स आणि रेटिना स्कॅनिंग करता येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close