बुऱ्हान वाणी होता हाफीज सईदच्या संपर्कात,ऑडिओ क्लीपमध्ये पर्दाफाश

December 2, 2016 4:33 PM0 commentsViews:

bruhan_Wani_hafiz_saeed02 डिसेंबर : अतिरेकी बुऱ्हान वाणी आणि लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या हाफीज सईद यांच्यातील फोनवरील संभाषण नेटवर्क 18 च्या हाती लागलंय. यामध्ये बुऱ्हान वाणीने हाफीझकडून मदत मागत असल्याचं उघड झालंय.

एवढंच नाहीतर भारतीय सैन्याविरोधात आम्ही लढायला तयार आहोत अशी गरळ वाणीने ओकलीये. त्याच्या या मनसुब्याला हाफीजने पाठिंबा दिला असून भारताशी सर्वोतपरी मदत केली जाईल अशी ग्वाहीही दिलीये. फोनवर बोलताना वाणी अतिशय भाऊक होऊन बोलत होता. मात्र, त्याचे हे मनसुबे भारतीय सैन्याने जुलै महिन्यात उधळून लावले. वाणीचा भारतीय सैन्याच्या एनकाऊन्टर वाणीचा खात्मा झालाय.

वाणी आणि हाफीज सईदमधील संवाद

बुऱ्हान वाणी – आपण कसे आहात?
हाफिज सईद – बुऱ्हान, आपण बोलताय का?
बुऱ्हान वाणी – हो.
हाफिज सईद – तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, आनंद वाटला. अल्ला तुम्हाला खूप संधी देवो. अल्ला तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप आयुष्य देवो

बुऱ्हान वाणी – तुमची तब्येत कशी आहे?
हाफिज सईद – माझी तब्येत ठीक आहे. आम्ही जाणतो. तुम्ही वाईट परिस्थितीत आहात. पण निराश होऊ नका.आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही आमच्याकडे मागा. आम्हाला जे शक्य असेत ते तुम्हाला मिळवून देऊ. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत… अडचणी आहेत, पण शत्रूचा बीमोड होईल, आम्ही अशी अल्लाकडे प्रार्थना करतो. जे काम करायचं आहे ते होईल. सगळं काम आपण मिळून करू.

बुऱ्हान वाणी – हो, काम नक्की होईल.
बुऱ्हान वाणी – आज आमची इच्छा पूर्ण झाली. तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली.
हाफिज सईद – तुम्ही आमचे खूप लाडके आहात. तुम्ही काम करत आहात. तुमच्या कु र्बानी आम्ही जाणून आहोत. भाई मला सांगत असतात. सगळे भाई तुमच्याबाबत खूश आहेत.

बुऱ्हान वाणी – लष्कर-ए-तोयबाचे पैसे आणि सामान जास्त येत नाही, याचं काय कारण आहे? काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? तर मी काही मदत करू का.
हाफिज सईद – नक्की… आम्ही तुमच्याकडूनही मदत घेऊ.

बुऱ्हान वाणी – आपल्याला ही संधी गमावली नाही पाहिजे. शत्रू पिछाडीवर आहे. आपण हे गमावता कामा नये. आपल्याला हल्ले केले पाहिजेत…आपण शत्रूला पराभूत केलं पाहिजे. इथून बाहेर काढलं पाहिजे. आपण मिळून काम केलं पाहिजे…लष्कर-ए-तोयबाच्या लोकांशी माझं बोलणं होत असतं. तुमची मदत हवीय. शत्रूला आपण इथून बाहेर काढू.

हाफिज सईद – ठीक आहे. सगळ्यांना आमचा सलाम. सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. आपण सगळे एकाच ध्येयासाठी काम करत आहोत.

बुऱ्हान वाणी – तुमच्याकडूनही लष्कर-ए-तोयबाला थोडी मदत जावी. आमच्यासाठी काही आज्ञा असेल तर सांगा. आपला शत्रू पण एक आणि आपलं ध्येयही एक.
लष्कर-ए-तोयबावाले म्हणताहेत की तुमच्याशी, बोलण्याची संधीच मिळत नाही.

हाफिज सईद – तुमच्याशी तरी बोलण्याची संधी मिळाली. बाकी आमच्याकडे सगळी खबरबात असतेच…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close