गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्याचा इशारा

May 10, 2010 12:22 PM0 commentsViews: 4

10 मे

नक्षलवादी गडचिरोलीमध्ये मोठ्या हल्ल्याची योजना तयार करत असल्याची माहिती आयबी म्हणजे इंन्टेलिजन्स ब्युरोने दिली आहे.

याबाबत आयबीने त्यांना मिळालेली माहिती महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे.

नक्षलवाद्यांकडे सध्या 8 हजार जणांची सशस्त्र फौज असून त्यातील 60 टक्के नक्षलवादी गडचिरोली आणि छत्तीसगडच्या दक्षिण भागात हल्ल्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान नक्षलवाद्यांच्या कुठल्याही हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे

close