जुन्या शिवसैनिकांचा सेनेला ‘जय महाराष्ट्र’, भाजपात प्रवेश

December 2, 2016 6:07 PM0 commentsViews:

 
suresh_gambhire03 डिसेंबर : मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार सुरेश गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासोबतच सेनेचे माजी नगरसेवक आणि बेस्ट समितीचे प्रदिर्घकाळ सदस्य असलेले सुनील गणाचार्यही भाजपमध्ये सामिल झालेत.

गणाचार्य याचा बेस्ट कामगार सेनेशी थेट संबंध होता. तर गंभीर यांनी सेनेतर्फे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.असे दोन्ही जुने आणि जाणते शिवसैनिकांनी निवडणुकीपूर्वी सेनेला सोडचिठ्ठी दिल्याने सेनेसाठी हा मोठा धक्का समजला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close