मुरलीधर महाराजाची रासलीला कॅमेऱ्यात कैद

December 2, 2016 7:03 PM0 commentsViews:

02 डिसेंबर : अमरावतीमधील मुरलीधर महाराजाची रासलीला करणारे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाल्याने एकच खळबळ उडालीये. महाराजांच्या मठातीलच स्नानगृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक नव्हे तर अनेक मुलींसोबत अश्लील चाळे करताना व्हिडिओमध्ये कैद झालंय. महाराजांची पोल खोलणारा हा व्हिडिओ एका सामाजिक कार्यर्त्याने समोर आणला आहे. या संबंधात आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

amravati_babaअचलपूर तालुक्यातील येलकीपूर्णा गावामध्ये संत बालयोगी मुरलीधर महाराजांचं मठ आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही महाराजांचे अनेक भक्त आहेत. महाराज भागवत सप्ताह आणि धर्मप्रवचनासाठी विदर्भ, मध्यप्रदेशात नेहमी जात असतात . गावामध्येच भव्य मंदिर, भक्त निवास अश्या सोईसुविधा महाराजांनी तयार करून ठेवल्या आहेत. पण महाराज ज्या ठिकाणी राहतात त्याठिकाणाच्या स्नानगृहात अनेक महिलांसोबत तो रासलीला करायचा असं या सीसीटीव्ही मधून स्पष्ट होतंय. सहा दिवसांच्या फुटेजमध्ये संत बालयोगी मुरलीधर महाराजांचं अनेक तरुण महिलांशी अवैध संबंध प्रस्थापित करताना दिसून येतंय .मुरलीधर महाराज हे समाजात धर्माच्या नावावर अनैतिकता पसरवत असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांत दाखल केली आहे. एका पीडित महिलेने महाराजांचे हे अश्लिल व्हिडिओ या सामाजिक कार्यकर्त्याकडे पोलीस कारवाई व्हावी म्हणून दिला,

आसेगाव पोलिसांनी तक्रार दाखल केलीय. महिला सेल आणि एनजीओच्या माध्यमातून पीडित महिलांचे बायान नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलीस सांगत आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली असून महिला कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष आहे। पोलीस काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close