आज शेवटच्या सुपर 8 मॅच

May 10, 2010 12:30 PM0 commentsViews:

10 मे

टी-20 वर्ल्डकपमध्ये आज ग्रुप ईमधील शेवटच्या सुपर 8 मॅच रंगतील. यातली पहिली मॅच खेळवली जाईल ती पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान.

सलग दोन पराभव पत्कारावे लागल्याने पाकिस्तानची टीम याआधीच स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे. पण दक्षिण आफ्रिकेसाठी ही मॅच अतिशय महत्वाची ठरणार आहे.

सुपर 8च्या पहिल्या मॅचमध्ये आफ्रिकेनं न्यूझीलंडचा पराभव केला पण पुढच्याच मॅचमध्ये त्यांना इंग्लंडकडून मात खावी लागली. त्यामुळे सेमीफायनल गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ही मॅच जिंकावीच लागणार आहे…

दुसरी मॅच आहे ती इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान. सुपर 8मध्ये इंग्लंडने पहिल्या दोन्ही मॅच जिंकत सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले. आता ही मॅचही जिंकत विजयाची हॅट्‌ट्रीक करण्याचा प्रयत्न इंग्लंड टीमचा असणार आहे.

केविन पीटरसन या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असल्याने इंग्लंड टीमचे पारडे जड आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या खात्यातही एक विजय आणि एक पराभव जमा आहे. त्यामुळे सेमीफायनल प्रवेशासाठी न्यूझीलंडलाही ही मॅच जिंकावी लागणार आहे.

close