सध्या तरी आमची युती, शेलारांचं तलवार म्यान

December 2, 2016 10:28 PM0 commentsViews:

ashish shelar 03 डिसेंबर : सध्या तरी शिवसेना आणि भाजपची पालिकेत युती आहे असं सांगत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या जीभेची तलवार तुर्तास म्यान केलीय.

भांडुपमधील जलबोगद्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे मनोमीलन झाल्यानंतर युतीबाबत भाजपने आपली भूमिका मवाळ केलीय. तसंच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणा-यांनी आता युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं म्हणत या विषयावर शेलार यांनी सारवासारव केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close