दारूबंदी आता साध्या बहुमताने

May 10, 2010 12:42 PM0 commentsViews: 97

10 मे

मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजी मोघे आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बैठकीत आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. तो म्हणजे, आता एखाद्या गावात महिलांच्या साध्या बहुमतानेही दारूबंदी लागू होऊ शकते.

या दारूबंदीसाठी जे मतदान घेतले जाईल त्यासाठीच्या मतदानाची वेळही वाढवण्यात आली आहे. आता सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

तसेच दारू पिण्यासाठीच्या परवान्याचे वय वाढवून ते 25 वर्ष करण्यात आले आहे. एका परमिटवर एका आठवड्याला आता फक्त 2 बाटल्या दारूची खरेदी करता येऊ शकेल.

तसेच सरकारला दारू विकून मिळणार्‍या महसुलातील अर्धा टक्के रक्कम दारू विरोधी प्रचारावर खर्च करण्यात येणार आहे.

याबाबत 10 वर्षांनी न्याय मिळाल्याची भावना दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

close