देशभरात टोलझोल सुरू, टोलनाक्यावर मोठ्या रांगा

December 3, 2016 10:02 AM0 commentsViews:

 l_tollplaza-1461322319

03 डिसेंबर : अखेर नोटाबंदीमुळे मिळालेल्या विश्रांतीमुळे राज्यासह देशभरात टोलचा झोल सुरू झाला असून मध्यरात्रीपासूनच मुंबईसह त्याच्या एन्ट्री पॉईंटवर पुन्हा वाहानांच्या रांगा लागल्या. त्यामुळे महिन्याभरापासून सुखकारक आणि सहज होणार्‍या प्रवासाला पुन्हा एकदा ब्रेक लागला. 24 दिवसांनंतर सुरू झालेल्या टोलमुळे ठिकठिकाणी ट्राफिक जाम झाला आहे.
टोलवर जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारल्या जातायत पण त्याही आता फारशा कुणाकडे नाहीत आणि दोन हजाराची नवी नोट दिली तर त्याचं सुट्टे द्यायला कुणी तयार नाही. 2०० रुपयांच्या वर टोल असल्यास 5०० ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र टोल 200 रुपयांपेक्षा कमी असल्यास सुट्टेच पैसे द्यावे लागणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे.

वाशी, उर्से टोलनाका तसंच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरच्या प्रवासालाही ब्रेक लागला आहे. वाहनधारकांची ठिकठिकाणच्या टोलनाक्यावर हमरीतुमरी होतेय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close