नोटबंदीचा आणखी एक बळी, एटीमच्या रांगेत थांबलेल्या कामगार नेत्याचा मृत्यू

December 3, 2016 12:09 PM0 commentsViews:

NGDeath

03  डिसेंबर : नोटबंदीनंतर एटीएमच्या रांगेत उभं राहिल्यामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अजून एकाची भर पडलीये. नागपूरच्या कोराडी परिसरात राहणारे कामगार नेते बाबूभाई भालादरे यांचा अचानक हृदय विकाराच्या झटका आल्याने एटीएमच्या रांगेतच मृत्यू झालाय. काल (शुक्रवारी) संध्याकाळीही घटना घडली आहे.

नोटाबंदी असल्याने पैशांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. बाबूभाई भालाधरे हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी कोराडी मार्गावरील पटेल पेट्रोलपंपावरील एसबीआयच्या एटीएमवर रांगेत उभे होते. एटीएमबाहेर रांगेत उभे असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने ते कोसळले.

त्यानंतर रांगेतील काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close